Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

पुणे : आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताण-तणाव दूर होत नाहीत. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन गरजेचे आहे.

नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्वकल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबरदरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीनदिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. संपूर्ण आरोग्याच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमासाठी नागरिकांची उत्स्फूर्त नोंदणी झाली आहे.

‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून मिळणार आहे. ‘स्वास्थ्यम्’चे उद्‍घाटन विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?

प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो. त्यातील फक्त दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ कशासाठी?

ध्यानधारणांविषयी शास्त्रीय माहिती : मनुष्याला अनेक शारीरिक व्याधी ‘मनाच्या अस्वस्थे’मुळे होतात. ताण-तणाव, मनात सुरू असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.

शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम : शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने शरीरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसे मिळवावे, हे जाणून घेऊ शकता.

उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग : मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींनी मानवी जीवनाचे योग्य संतुलन राखले जाते.

अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध : अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो. स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरीक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

सकस आहार आणि आरोग्य : धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक आणि सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला, तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.

गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध : आपल्या आवडीचे गाणे किंवा संगीत ऐकले, की मन प्रसन्न होते. म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन-संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

प्राणायाम म्हणजे काय?

प्राणायाम म्हणजे प्राणाचे किंवा श्वासाचे आयाम किंवा विस्तार. प्राणायम हा योगाचा एक भाग असून, यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत. योग्य व शास्त्रीय पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करतो. योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो आणि आपले शरीर आणि मन संतुलित करतो.

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam