
Swasthyam 2023 : पर्यावरण व मानवी संस्कृती
- अशोक तातुगडे
पर्यावरण व सजीव सृष्टीची व मानवाची उत्क्रांती यांच्याबरोबरीनेच विकास झाला. चांगले व पूरक पर्यावरण असले, की संस्कृती भरभराटीला येते आणि पर्यावरणाचे असंतुलन झाल्यावर तिचा ऱ्हास सुरू होतो. आजच्या काळातही हा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
अनियमित हवामान बदल आणि हरितगृह वायूंची समस्या आता दुर्लक्ष न करण्यासारखी समस्या बनली आहे. चक्रीवादळे, महापूर, तापमान वाढ, वणवे, भूस्खलन, हिमनद्या वितळणे, समुद्र पातळी उंचावणे, विविध साथी फैलावणे यांची वारंवारिता बघितल्यास त्यांची व्याप्ती आणि स्वरूप भयावह पातळीला गेले आहे.
आव्हान पेलण्यासाठी...
एक किलो कोळसा जाळणे व एक लिटर पेट्रोल, डिझेल वापरणे हा वसुंधरेविरुद्ध अक्षम्य गुन्हा
सर्व ऊर्जानिर्मिती सौर, पवन, जैव संसाधन आधारित असावी.
व्यक्तिगत वापराचे मोटार वाहन बाद करून सार्वजनिक, पर्यावरणस्नेही, रेल्वे व जल वाहतुकीस प्राधान्य देणारी वाहतूक साधने असावीत.
प्रवास व पर्यटन प्रकृती दर्शनासाठी असावी, चैन व मौजेसाठी नाही.
रासायनिक व उद्योग शेती उत्पादन पद्धतीमुळे दूषित झालेली अन्नश्रृंखला, जैवविविधता, सेंद्रिय पद्धतीची शेती याद्वारे करणे जरुरी आहे अन्नसुरक्षेची कल्पना स्थानिक पर्यावरणीय संसाधनांशी निगडित असावी.