Swasthyam 2023 : पृथ्वीचे पर्यावरण व आपण

विज्ञानात झालेल्या संशोधनाप्रमाणे आपण असे मानतो, की पृथ्वीची उत्पत्ती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली.
Swasthyam 2023 Earth environment and human being science weather Helium and Hydrogen
Swasthyam 2023 Earth environment and human being science weather Helium and Hydrogensakal

- अशोक तातुगडे

विज्ञानात झालेल्या संशोधनाप्रमाणे आपण असे मानतो, की पृथ्वीची उत्पत्ती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी वातावरणाचीही निर्मिती झाली. वातावरणात मुख्यत्वे हेलियम आणि हायड्रोजन हेच वायू होते.

पृथ्वीच्या वितळलेल्या कवचातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेने हे वायू तयार झाले होते. साधारण ३५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी थंड व्हायला लागली, तिचे आवरण म्हणजेच आपली जमीन घट्ट व्हायला सुरुवात झाली. त्या वेळी वातावरणातले ग्रीन हाऊस गॅसेस तयार व्हायला लागले.

उदा. कार्बन डायऑक्साईड अमोनिया. या वेळेपर्यंत ऑक्सिजन निर्मिती झाली नव्हती, नंतरच्या काही लाख वर्षांत पृथ्वी थंड होत गेली व समुद्र निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली.

तेव्हाच वनस्पतींच्या निर्मितीची सुरुवात झाली. हीच सजीवांच्या निर्मितीची सुरुवात होती. या वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषूण ऑक्सिजन तयार करायला लागल्या आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढले. वनस्पतींचे, ऑक्सिजनचेही प्रमाणही वाढले. त्यानंतर कित्येक वर्षांनी इतर वायू निर्माण झाले.

कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायू, जे पृथ्वीने इन्फ्रारेड स्वरूपात बाहेर फेकलेली ऊर्जा किंवा उष्णता शोषूण घेतात आणि पृथ्वीवर ग्रीन हाऊस सारखेच काम करतात. यालाच ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ म्हणतात. हे ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणात नसल्यास सर्व इन्फ्रारेड किरण शोषले गेले असते आणि मग पृथ्वी खूपच थंडगार झाली असती.

सजीव जगू शकले नसते. या सर्व वायूंच्या निर्मितीला लाखो वर्षे लागली. आता आपल्या पृथ्वीच्या वातावरणात ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन आणि शेवटचा एक टक्का हा अर्गोन, कार्बन डायऑक्साइड, निऑन, हेलियम, मिथेन, झेनॉन, हायड्रोजन आणि इतर काही वायू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com