Swasthyam 2023 : सुखासन

आपण लहान मुले, किशोरवयीन मुले यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या योगासन, प्राणायाम याबद्दल आजपासून जाणून घेणार आहोत.
Swasthyam 2023 manali dev writes yoga youth health
Swasthyam 2023 manali dev writes yoga youth health sakal
Updated on
Summary

आपण लहान मुले, किशोरवयीन मुले यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या योगासन, प्राणायाम याबद्दल आजपासून जाणून घेणार आहोत.

आपण लहान मुले, किशोरवयीन मुले यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या योगासन, प्राणायाम याबद्दल आजपासून जाणून घेणार आहोत.

व्यायामात् लभते स्वस्थं

दीर्घायुष्य बलं सुखं!

आरोग्य परमं भाग्यं

स्वास्थं सर्वार्धासाधनम्

नियमित व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घायुष्य, ताकद, सुख मिळते. उत्तम निरोगी आयुष्य हेच परमभाग्य आहे. त्यामुळे मिळालेले स्वास्थ हेच आपल्या सुखाचे साधन आहे. याचाच अर्थ मुलांनी दररोज मैदानी खेळ, योगासने, ध्यान करणे आवश्यकच आहे.

मुलांच्या जीवनातही काही मानसिक समस्या असतात. त्या काय आहेत, काय होतंय हे त्यांना अनेकदा व्यक्त करता येत नाही. शारीरीक व्याधींवर डॉक्टरांचा सल्ला, योगाभ्यास उपयोगी पडतो. तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी योगाभ्यास लाभदायी आहे. या शृंखलेत आपण काही सोपी आसने, श्वसनप्रकार, ध्यान इ. याविषयी जाणून घेणार आहोत.

विशेषतः कोरोनानंतर पुन्हा सर्व जीवनशैली सुरळीत झाली आहे. परंतु या दोन वर्षांच्या कालावधीत त्याचा मुलांवरही शारीरीक मानसिक थोडाफार परिणाम झालाच आहे. पूर्णवेळ घरातच असल्याने मोबाईल, आयपॅड, गॅजेटची खूप सवय लागली.

कारण शाळा ॲक्टिव्हिटी या व्हर्च्युअल होत होत्या. त्यामुळे शरीराला फार व्यायाम, ताण, मोकळी हवा तेव्हा मिळाली नाही. वजन वाढणे, डोळ्यांना चष्मा लागणे, चिडचिड वाढणे, हार्मोनल संतुलन बिघडणे अशी लक्षणेही बऱ्याच मुलामंध्ये दिसत आहे. या सर्व तक्रारी दूर होण्यासाठी योगासन, ध्यान, योग्य आहार-विहार याचा उपयोग होणार आहे.

आपण आज ‘सुखासन’ची माहिती घेऊयात. अगदी छान, शांत, सहज येणारे आसन. मस्तपैकी मांडी घालून बसायचे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आणि डोळे बंद ठेवायचे. रोज सकाळी उठल्यानंतर ५-१० मिनिटे असे बसावे. यामुळे ध्यान छान होते. स्वतःला सकारात्मक सूचना द्याव्यात. आजचा दिवस कसा उत्तम असेल असे मनाला सांगावे. स्वतःबद्दल छान विचार करावा. नंतर ११ वेळा ओंकार म्हणावे व शांतपणे डोळे उघडून रोजच्या जीवनक्रमाला सुरुवात करावी.

रोज झोपायच्या आधी सुखासनमध्ये बसणार असाल तर दिवसभराचा थकवा निघून जायला, डोक्यातील नको ते विचार कमी व्हायला मदत होईल. मानसिक शांतता मिळण्यास मदत होईल. झोपही शांत लागते. असे हे सोपे सहज जमणारे आसन सर्वांनीच रोज नक्की करून बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com