Swollen Lymph Nodes
sakal
- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
डॉक्टर, त्याच्या मानेभोवती गाठी आहेत... कशाच्या असतील हो? घाबरण्याचं काही कारण तर नाही ना?’ एका ४ वर्षांच्या मुलाची आई मला विचारत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मुलांच्या मानेभोवती, काखेत, जांघेत आणि शरीराच्या इतर भागात लहान-लहान गाठी येऊ शकतात. त्या गाठी लसिका ग्रंथी (लिम्फ नोड्स) असू शकतात. या लसिकाग्रंथी विषयी जाणून घेऊयात.