

Listening to calming music can help reduce stress, improve mood and promote emotional well-being.
Sakal
रश्मी घरी आली तेव्हा अगदी कातावलेली होती. आज दिवसभरात तिला उसंत मिळाली नव्हती. काही महत्त्वाची वैयक्तिक कामं मार्गी लावण्यासाठी तिने आज ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. अनेक गोष्टी एका मागोमाग एक करत ती शहरभर भिरभिर फिरली आणि अंधार पडल्यावर घरी पोहोचली. नवरा ऑफिसमधून आला नव्हता आणि मुलगा शिकवणीला गेला होता. सासूबाई घरी होत्या. पण रात्रीच्या स्वयंपाकाचं काम बहुतेक वेळा रश्मीकडे असायचं. सोफ्यावर बसताना तिला आता पुढे स्वयंपाक करणं वाढून ठेवलं आहे ही जाणीव झाली आणि अगदी थकल्यासारखं वाटू लागलं. तेवढ्यात सासूबाई समोर येऊन बसल्या. त्यांनी स्वत:बरोबरच रश्मीसाठीही कडक चहा करून आणला होता. रश्मीला वाटलं, ‘‘वा! आता हेच हवं होतं!’’ सासूबाई म्हणाल्या, ‘‘मी आता रेडिओवर थोडा वेळ जुनी गाणी लावणार आहे. चालेल ना गं तुला?... दमून आलीस म्हणून विचारलं!’’