तर काय ?

तर काय? डोळ्यांपुढे 'डबल' दिसतेय की उन्हाळ्यातील डोकेदुखीने त्रस्त आहात? वाचा, सातारकर आणि कोल्हापूरकरांच्या शंकांना मिळालेले शास्त्रीय उत्तर
Double Vision and Eye Fatigue: Addressing the Impact of Screen Time

Double Vision and Eye Fatigue: Addressing the Impact of Screen Time

sakal

Updated on

प्रश्न: मला गोष्टी डबल डबल दिसतात व त्याच बरोबर स्पष्ट दिसत सुद्धा नाही. जास्त वाचन केलं, टीव्ही पाहिला की हा त्रास वाढतो. मी दोन तीन नेत्रतज्ज्ञांना दाखवलं पण फायदा होत नाही. कृपया याच्यावरती आयुर्वेदिक औषधी उपचार सुचवावा.

- श्री. महेश मणोत, सातारा

उत्तर : पत्रावरून वय कळू शकले नाही. पण सध्याच्या काळात चाळिशीनंतर डोळे जेव्हा कमकुवत व्हायला लागतात तेव्हा जास्त प्रमाणात मोबाईल वापरण्याने किंवा टीव्ही पाहिल्याने डोळ्यांची एकूणच कार्यशक्ती कमी होताना दिसते. त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये जडपणा, अस्पष्ट दिसणे व तसेच मोतीबिंदू वगैरेसारखे प्रकार कमी वयातच आढळायला लागलेले आहेत. सध्या तरी त्रिफळा, लोध्र इत्यादी नेत्रानं हितकर द्रव्यांपासून बनवलेलं संतुलन सुनयन घृतसारखं तूप रोज सकाळी एक चमचा घेण्याचा फायदा होऊ शकेल. तसेच रोज डोळ्यांमध्ये संतुलनचे सॅन अंजन क्लिअर हे रंगविरहित काजळ सकाळ संध्याकाळ डोळ्यांत घातलेले उत्तम राहील. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर संतुलनचे आय पॅड्स ठेवावे किंवा गार गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्या. शक्य झाल्यास टीव्ही बघणे किंवा गाडीत बसलेले असताना मोबाईल बघणे पूर्णपणे टाळावे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध औषधी तेल व तुपाची प्रकृतीप्रमाणे नेत्रबस्ती करून घेण्याचासुद्धा फायदा मिळू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com