

What is Tech Neck and Why it Happens
Sakal
डॉ. अजय कोठारी (कन्सल्टंट स्पाइन सर्जन)
अस्थिबोध
स्मार्टफोननं जग जवळ आणलं - काम, बँकिंग, सोशलायझिंग, फोटो, रील्स... सगळं बोटांच्या टोकावर; पण या सोयीची एक शांत किंमतही आहे - ‘टेक-नेक’. आज १५-५० वयोगटातील मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये मानखांद्याचं दुखणं, डोकेदुखी, वरच्या पाठीला स्टिफनेस आणि हातात झिणझिण्या वाढताना दिसतात. अनेकांना वाटतं, ‘‘थोडं दुखतंय, ठीक होईल...’’; पण मान वाकवून तासन्तास स्क्रीनकडे पाहण्याची सवय हळूहळू कण्याची रचना बदलू शकते. म्हणूनच टेक-नेक हा केवळ फॅड शब्द नाही - तो आधुनिक जीवनशैलीचा महत्त्वाचा आरोग्य धक्का आहे.