

Baby Teething Symptoms and Remedies Learn When Babies Start Teething and How Parents Can Manage Pain and Discomfort Safely
sakal
-डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
मुलाला जुलाब होत असतील किंवा आजारी असेल तर पालकांचा पहिला प्रश्न ‘मुलाला दात तर येत नसतील ना?’ हा असतो. दातांची म्हणून घरगुती उपाय केले जातात, मग उशीर होतो अन् बाळाचा आजार लवकर उपचार न केल्यामुळे विकोपास जातो.
वास्तविक बालकाला ‘दात येणे’ ही त्याच्या शारीरिक विकासाची एक नाॅर्मल प्रक्रिया असून त्यामुळे त्यामुळे खरं तर कुठल्याही आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत.
साधारणत: दुधाचे दात (temporary) वयाच्या सहा ते नऊ महिन्यांदरम्यान येऊ लागतात. कधी कधी ते बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत किंवा त्यानंतरही येतात. सुदृढ बाळामध्ये त्याचं कारण बहुतांशी अानुवांशिक असतं. मात्र, दुधाचे दात येण्यास उशीर झाला तर त्याला मुडदुस (rickets) किंवा हायपोथायराॅयडिझम किंवा पिट्युटरीग्रंथीच्या हार्मोन्सचे आजार असण्याची शक्यता असते.