

Biological Oleation: Defining Youth Beyond Chronological Age via Tissue Lubrication Metrics
Sakal
डॉ. मालविका तांबे
तारुण्य म्हटलं की समोर दिसतं... उत्साह, ऊर्जा आणि उज्ज्वल भविष्य. असं म्हणतात की समाजामध्ये चांगले योगदान देणारी तरुणाई एखाद्या देशाला लाभली तर त्याचा विकास नक्की होतो. सध्याच्या काळात जेनझी, जेन अल्फा हे सगळे शब्द आपल्याला खूप सामान्यपणे सगळीकडे वापरताना दिसतात. सध्याच्या काळातली तरुणाई ही तंत्रज्ञानाच्या युगात मोठी झालेली आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, लॅपटॉप्स, सोशल मीडिया म्हणावं तेवढं तंत्रज्ञान डिजिटल युगामध्ये त्यांना उपलब्ध आहे. आजूबाजूला चाललेल्या सगळ्या विषयांवर त्यांचे तयार होणारे मत, त्यांची स्वतःकरता, समाजाकरता, परिवाराकरता असलेली जबाबदारी, या सगळ्यांवर डिजिटल युगाचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव होताना दिसतोय. परंतु तारुण्य म्हणजे फक्त वय का? तारुण्य म्हणजे शरीरामध्ये अमाप शक्ती, भरपूर टिकणारी कार्यक्षमता, मानसिक उत्साह तसेच स्वभावातली लवचिकता. सर्व इंद्रिय, सर्व शरीर आपल्या कार्यक्षमतेच्या जास्तीत जास्त पातळीवरती असलेले. एवढेच नव्हे तर शरीरामध्ये आणि मनामध्ये असणारी स्निग्धता. अर्थात ओलिएशन. ज्याच्यात नवीन गोष्टी स्वीकारण्याचा, नवीन वातावरणात मिसळण्याचा, नवीन कौशल्य शिकण्याचा, नवीन कार्यपद्धती स्वीकारण्याचा गुण आपल्याला पुरेपूर दिसायला पाहिजे.