
थोडक्यात:
सतत मान वाकवून मोबाईल पाहण्यामुळे मानेवर अतिरिक्त ताण येऊन तीव्र मानदुखी निर्माण होते.
हा त्रास पुढे वाढून ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’मध्ये रूपांतर होतो, ज्यामुळे मेंदू व मणकाविकारतज्ज्ञांकडे रुग्ण वाढले आहेत.
विशेषतः तरुण, विद्यार्थी आणि आयटी कर्मचारी यांच्यात हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो.
Effects of Smartphone Usage on Neck Health: सतत मान वाकून मोबाईलकडे पाहण्याची सवय आता मानेचे आरोग्य बिघडवू पाहत आहे. उभ्या-उभ्या सतत मोबाईलकडे वाकून पाहण्याच्या सवयीमुळे मानेवर डोक्याचे अतिरिक्त ओझे पडत असल्याने मानदुखीचा त्रास सुरू होतो. हा त्रास वाढून पुढे ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ होतो. मेंदू व मणकाविकारतज्ज्ञांकडे मानदुखीचा त्रास घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या अलीकडील काळात वाढली आहे. त्यासाठी मान सरळ ठेवून स्क्रीन पाहावी, असा सल्ला डॉक्टर देतात.
विशेषतः तरुणपिढी, विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी यांच्यामध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळून येत आहे. दिवसातील अनेक तास मोबाईलवर वाकून राहिल्यामुळे मानेच्या मांसपेशींवर, मानेच्या मणक्यांवर अनावश्यक ताण येतो. त्यामुळे, सतत मान दुखते.
मान सरळ असल्यावर डोक्याचे वजन समतोल राहते. मात्र, सतत खाली पाहिल्यामुळे डोक्याचे वजन हे मानेच्या मणक्यांवर पडते व मग ताण आल्याने मान दुखते. सध्या मानदुखीचे रुग्ण जास्त दिसून येत आहेत. याचा परिणाम आणखी काही वर्षांनी अधिक तीव्रतेने जाणवेल व रुग्णसंख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम मोबाईलऐवजी टीव्हीवर पाहावे, कारण टीव्ही पाहताना मान सरळ राहते.
- डॉ. अक्षय गुप्ते, न्यूरोसर्जन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
देशात झालेल्या अभ्यासानुसार स्मार्टफोन वापरामुळे ‘टेक्स्ट नेक्स्ट सिंड्रोम’च्या रुग्णांची संख्या २५ ते ४७ टक्के इतकी प्रचंड आहे व ही संख्या वाढत आहे. मुख्यतः लहान मुलांमध्ये हे लक्षणे दिसतात. सारखा टॅब किंवा मोबाईल वापरल्यामुळे व चुकीची बैठी शैलीमध्ये (ॲबनॉर्मल पोश्चर) बसून अभ्यास केल्यामुळे ही लक्षणे वाढल्याचे निदर्शनास येते. याचे खूप गंभीर गुंतागुंत अद्याप मुलांमध्ये नसली तरी तरुणांमध्ये मात्र याची गुंतागुंत झालेली दिसते.
- डॉ. प्रवीण सुरवसे, न्यूरोसर्जन व सहयोगी प्राध्यापक, ससून
टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? (What is Text Neck Syndrome?)
सतत मान वाकवून मोबाईल, टॅब वापरण्याच्या सवयीमुळे मानेवर ताण येतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ म्हणतात.
टेक्स्ट नेक सिंड्रोम कुणामध्ये अधिक आढळतो? (Who is more likely to suffer from Text Neck Syndrome?)
तरुण पिढी, विद्यार्थी, आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच सतत मोबाईल व टॅब वापरणारी लहान मुले यामध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो.
टेक्स्ट नेक सिंड्रोम टाळण्यासाठी काय करावे? (How can one prevent Text Neck Syndrome?)
मोबाईल किंवा स्क्रीन पाहताना मान सरळ ठेवावी, शक्य असल्यास टीव्हीवर पाहावे, आणि चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे टाळावे.
या सिंड्रोमचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात? (What can be the long-term effects of this syndrome?)
मानेच्या मणक्यांवर सतत ताण आल्याने भविष्यात गंभीर मणकाविकार उद्भवू शकतात आणि रुग्णसंख्याही वाढू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.