- डॉ. मालविका तांबे
संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघितली जाते. हे दहा दिवस सगळ्यांच्या आयुष्यात एक वेगळा उत्साह व आनंद घेऊन येतात. सर्व बाजारपेठा गणेशाच्या पूजनाला लागणाऱ्या गोष्टींनी भरलेल्या असतात. तसे तर गणरायाच्या आशीर्वादाने आयुष्यात सगळ्याच गोष्टी साध्य होतात.