- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदाप्रमाणे जेव्हा लंघन व उपवास केला जातो तेव्हा जो अग्नी अन्न पचवते तोच अग्नी शरीरातील दोष अर्थात शरीरातील विषद्रव्ये, जीर्ण झालेले धातू यांचेही पचन करतो. हल्लीच्या संशोधनाने सुद्धा सिद्ध केलेले आहे की फास्टिंग उचित प्रकारे केल्यास ऑटोफेजी अर्थात स्वतःला खाण्याची प्रक्रिया शरीरात सुरू होते.