- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
‘तुमचं कोलेस्टेरॉल वाढलंय’ असं डॉक्टरांनी सांगितलं, की आपण घाबरतो. लगेच हृदयविकार, स्ट्रोक यांची भीती डोक्यात येते. अनेकांना वाटतं की कोलेस्टेरॉल म्हणजे शरीराचा शत्रू; पण खरं सांगायचं, तर कोलेस्टेरॉलशिवाय शरीराचं जगणंच अशक्य आहे!
कोलेस्टेरॉल हा प्रत्येक पेशीच्या भिंतीचा (cell membrane) महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे पेशी टिकून राहतात. शरीरातील अनेक संप्रेरकं (हार्मोन्स), व्हिटॅमिन डी आणि पचनासाठी आवश्यक असलेला पित्तरस हे सर्व कोलेस्टेरॉलपासूनच तयार होतात. म्हणजेच हा पदार्थ वाईट नाही, तर अत्यावश्यक आहे.