प्रश्न : नमस्कार, सद्गुरू! एखाद्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होण्यामागे श्वासाची भूमिका काय आहे?
सद्गुरू : योगिक परिभाषेत श्वासाला कूर्म नाडी असे म्हटले जाते. कूर्म नाडी ही अशी गोष्ट आहे- जी तुम्हाला एक अस्तित्व म्हणून या भौतिक शरीरासोबत जोडून ठेवते. तुम्हाला याबद्दल माहिती असेल, की हे शरीर आपण खात आलेल्या सर्व गोष्टींचा एक साठा आहे, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर हे शरीर फक्त या पृथ्वीचा एक भाग आहे.