निरोगी आयुष्यासाठी आवश्यक पावले

कॅन्सर हा आजकाल झपाट्याने वाढणारा आजार बनला आहे.
Cancer Desease
Cancer Deseasesakal
Updated on

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सर हा आजकाल झपाट्याने वाढणारा आजार बनला आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहाराच्या बदलांमुळे कॅन्सरची शक्यता वाढते; पण काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारून आपण कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतो.

आनंदी राहा

सतत तणावाखाली राहणे हे शरीरावर प्रतिकूल परिणाम करते आणि कॅन्सरसाठी जबाबदार ठरू शकते. हसतमुख राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनातील छोट्या छोट्या आनंदांचा स्वीकार करा.

योग आणि व्यायाम

दररोज योग, ध्यान आणि शारीरिक व्यायाम केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि कॅन्सरशी लढण्याची ताकद मिळते. व्यायामामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

पेस्टिसाइड्स आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा

रासायनिक खतांचा वापर केलेले अन्न आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पॅकबंद पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. शक्य तितक्या ऑरगॅनिक आणि घरगुती पदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये करा.

साखर मर्यादित ठेवा

अधिक प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात इन्फ्लेमेशन (दाह) वाढतो, जो अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे साखर नियंत्रित प्रमाणात घ्या आणि नैसर्गिक गोड पदार्थ निवडा.

तणावमुक्त जीवनशैली

दीर्घकालीन तणाव शरीराच्या पेशींवर नकारात्मक परिणाम करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. ध्यान, संगीत, छंद आणि चांगल्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

तंबाखू आणि मद्य टाळा

तंबाखू आणि मद्यपान हे कॅन्सरच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. यापासून दूर राहणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

नियमित वैद्यकीय तपासणी

प्राथमिक टप्प्यावर कॅन्सर ओळखता आला तर तो नियंत्रणात ठेवणे सोपे होते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करून घ्या आणि या.

मुख्यतः महिलांना असे काही त्रास अंगावर काढण्याची सवय असते.. तसे न करता शरीरात काहीही बदल तुम्हाला दिसले किंवा कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आरोग्यदायी सवयी, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास शरीर मजबूत आणि रोगप्रतिकारक बनते. दैनंदिन आयुष्यात थोडेसे बदल केल्याने मोठा परिणाम होऊ शकतो. आनंदी राहणे, योग्य प्रमाणात व्यायाम आणि मनःशांती राखणे या गोष्टी केवळ कॅन्सरपासून नाही, तर इतर अनेक आजारांपासूनही बचाव करू शकतात. तसेच, नैसर्गिक आणि ताजे अन्न खाणे आणि पुरेशी झोप घेणे यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आरोग्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आजपासूनच निरोगी जीवनशैली अवलंबा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com