True Strength of Character
sakal
लहानपणी मी घरातल्या मोठ्यांमध्ये एक गोष्ट वारंवार पाहत गेले. ते म्हणजे त्यांच्या बोलण्यात नेहमी स्पष्टता होती, त्यांच्या वागण्यात नेमकेपणा होता आणि त्यांच्या निर्णयांमध्ये कुठलाही संभ्रम नसायचा. ते जे बोलत, तेच करत. जे योग्य आहे, तेच निवडत. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा शांत ठामपणा होता.