रात्रीच्या जेवणात दही खाल्ले तर चालते का? याबद्दल बऱ्याच जणांकडून मी वेगवेगळी मते ऐकली आहेत. कृपया शंकेचे निरसन करावे.
- सीमा दातार, पुणे
उत्तर - आयुर्वेदात दही सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेले आहे. तसेही दह्यापेक्षा ताक घेणे जास्त उत्तम असते. दही खाण्याचे सर्व नियम डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर दह्याच्या व्हिडिओमध्ये समजावलेले आहेत, कृपया ते बघावे. दही नुसते खाण्यापेक्षा भाताबरोबर सकाळच्या जेवणात शेवटी खाणे उत्तम.
दहीभातापेक्षासुद्धा ताकभात खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. रात्री पचनशक्ती कमी असल्यामुळे दहीच नव्हे तर दूध व ताक टाळणे इष्ट. दुपारच्या जेवणात ताक नियमाने वर्षभर घेता येते. ताकात जिरेपूड, सुंठ, काळे मीठ घालून घेतल्यास जास्त उत्तम.