Harmful Habits For Brain : या 5 वाईट सवयींमुळे तुमचा मेंदू होऊ शकतो कमकुवत, वेळीच या सवयी सोडा नाहीतर..

कोणत्या 5 सवयी आहेत ज्यांच्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते ते जाणून घेऊया.
Harmful Habits For Brain
Harmful Habits For Brainesakal

Harmful Habits For Brain : साधारण असा प्रत्येकाचा समज असतो की वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होते. मात्र हल्ली ही समस्या कमी वयाच्या लोकांमध्येही दिसून येते. आणि या समस्येस कारणीभूत आहे तुमच्या वाईट सवयी. अल्झायमर आणि डिमेंशिया हे असे दोन आजार आहेत जे स्मरणशक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. चला तर कोणत्या 5 सवयी आहेत ज्यांच्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते ते जाणून घेऊया.

नाश्ता न करणे

तुम्ही सकाळी ऑफिसला किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत सकाळचा नाश्ता स्किप करत असाल तर याचा तुमच्या मेंदूवर घातक प्रभाव पडू शकतो. नाश्ता न करण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा, कमकुवत इम्युनिटी, कमकुवत स्मरणशक्ती, लो ब्लड शुगर इत्यादी समस्यांचा धोका वाढू शकतो. तेव्हा या समस्यांपासून बचाव करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ३ तासांत नाश्ता करून घ्यावा.

जास्त गोड खाणे

तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर तुमची ही सवय तुम्ही लगेच बदलायला हवी. गरजेपेक्षा जास्त रिफाइंड शुगर तुमच्या मेंदूसाठी घातक ठरू शकते. तुमच्या मेंदूची कार्यक्षमतासुद्धा यामुळे प्रभावित होते.

झोप न येणे

निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे फार महत्वाचे आहे. तज्ज्ञ सांगतात की जे ६ तासांपेक्षा कमी झोप घेतात आणि ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतात त्यांच्यात लठ्ठपणा आणि मेंदूसंबंधित आजारांचा धोका वाढतो.

Harmful Habits For Brain
Dementia Risk Factors : डिमेंशिया आजार काय आहे, इंटरनेटचा वापर केल्याने हा आजार कमी होऊ शकतो?

जंक फूड

तुम्ही फार जंक फूड खात असाल किंवा गरजेपेक्षा जास्त कोल्ड ड्रिंक पित असाल तर त्याचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. तेंव्हा मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी जंक फूडऐवजी भाज्या, फळे यांचा समावेश करून घ्या. (Health)

Harmful Habits For Brain
Headphone Use : कानात बरोबर हेडफोन घालणं आहे गरजेचं, त्यावर लिहिलेल्या 'L' आणि 'R' कडे करू नका दुर्लक्ष; नाहीतर...

हेडफोनवर गाणे ऐकणे

हेडफोनचा जास्त वापर केल्यास म्हणजेच तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत गाणे ऐकल्यास तुमच्या कानाच्या आणि मेंदूच्या नर्व्ह्ज डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा कमी हेडफोन्स लावण्याचा सल्ला देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com