Raw Garlic Side Effects : या लोकांनी कधीही खाऊ नये कच्चे लसूण, जाणून घ्या यामागील कारणे

काही लोकांनी कच्चे लसूण कधीच का खाऊ नये, यामागील कारणं जाणून घेऊया सविस्तर…
Raw Garlic Side Benefits
Raw Garlic Side BenefitsSakal
Updated on

Raw Garlic Side Effects : प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. 

हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Raw Garlic Side Benefits
Health Care News: पडल्यामुळे पाठीला दुखापत झाली आहे? मग या गोष्टी केल्याने लगेच मिळेल आराम

गर्भवती महिला 

गर्भवती महिलांनी कच्चे लसूण खाणे टाळावे. कारण यामुळे प्रसूतीच्या वेदना सुरू होऊ शकतात. कच्च्या लसणाच्या सेवनामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. ज्यामुळे पोटात जळजळही होऊ शकते.

Raw Garlic Side Benefits
Health News : उन पावसाचा खेळ सुरु असताना आरोग्य कसे जपावे? डॉक्टर काय सांगतात

यामुळे गर्भवती महिलांच्या पचनप्रक्रियेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा परिस्थितीत महिलांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच आहारामध्ये लसणाचा समावेश करावा.  

Raw Garlic Side Benefits
Cancer Diagnosis : कॅन्सरचे निदान आता होणार अचूक; व्हीएनआयटीत ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ तंत्रज्ञान विकसित

पोटाशी संबंधित समस्या

कच्च्या लसणामुळे पोटात जळजळ होणे, पेटके येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण कच्च्या लसणामध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म असतात आणि याचे अधिक प्रमाणात सेवन केलं तर अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. 

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी  

लसणाच्या सेवनामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. कच्च्या लसणामुळे रक्त पातळ होऊ शकते, ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अथवा शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होतो. म्हणूनच शस्त्रक्रियेच्या काही दिवसांपूर्वी तसंच शस्त्रक्रियेच्या दिवशी कच्च्या लसणाचे सेवन करू नये.   

रक्त पातळ करणारी औषधे  

रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करण्याच्या वेळेस कच्च्या लसणाचे सेवन करू नये. कारण लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाऊंड असते, जे शरीरातील रक्त पातळ करू शकते आणि यामुळे रक्तस्रावाची समस्या वाढू शकते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com