Mental Health : दिवसभरातील थकवा आणि ताण-तणाव दूर करण्यासाठी 'या' थेरपींची घ्या मदत

तणावमुक्त होण्यासाठी थेरपी आणि ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरते.
Mental Health
Mental Health esakal

Mental Health : दिवसभरातील काम आणि इतर गोष्टींमुळे आपल्या शरीराल थकवा येतो. त्यासोबतच आपण तणावग्रस्त होतो. खरं तर अशा परिस्थितीमध्ये आपले मन खचून जाते आणि मग नैराश्य येते. अशा परिस्थितीमध्ये आपण तणावमुक्त राहण्यासाठी विश्रांती घेणे गरजेचे आहे.

पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा निघून जातो आणि मन रिलॅक्स होण्यास मदत होते. मात्र, तणावमुक्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी आणि ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरतात. यासाठी फक्त तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकामधून स्वत:साठी थोडा वेळ काढणे फायदेशीर ठरते.

आज आपण अशाच काही सोप्या टीप्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वत:ला तणावमुक्त ठेवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्स.

Mental Health
Meditation For IQ : मेडिटेशन केल्याने फोकस आणि IQ देखील वाढू शकतो? संशोधनात करण्यात आला दावा

डीप ब्रिदिंग थेरपी (Deep Breathing)

मन आणि शरीराचा थकवा घालवण्यासाठी डीप ब्रिदिंग करणे अतिशय फायद्याचे आहे. यामुळे, मन रिलॅक्स राहण्यास देखील मदत होते. डिप ब्रिदिंगची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही घराबाहेर कुठे ही वेळ काढून याचा सराव करू शकता. यामुळे, श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील मजबूत होते.

deep breathing
deep breathing

या प्रक्रियेमध्ये डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला जातो, त्यामुळे, या दरम्यान मनात अनेक प्रकारचे विचार येतात आणि जातात. त्यामुळे, मन शांत आणि आपले शरीर क्रियाशील राहण्यास मदत होते. त्यामुले, दिवसभरातील थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी डीप ब्रिदिंग अवश्य करा.

अरोमा थेरपी (Aroma Therapy)

अरोमा थेरपीच्या मदतीने तुम्ही तणावग्रस्त वातावरणातून बाहेर येऊ शकता, यामुळे, तणावापासून मुक्ती मिळते. तसेच, आपले मन शांत राहते आणि आपले शरीर ऊर्जेने परिपूर्ण होते.

Aroma Therapy
Aroma Therapy

अरोमा थेरपीमध्ये सुगंधित अगरबत्ती, सुगंधित मेणबत्ती आणि डिफ्यूझरच्या मदतीने आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित होण्यास मदत मिळते. ज्यामुळे, आपल्याला उत्साही वाटते, त्यामुळे, तणाव दूर होतो आणि मन शांत आणि रिलॅक्स राहण्यास मदत होते. त्यामुळे, ही सिंपल अरोमा थेरपी नक्की करून पहा.

म्यूझिक थेरपी (Music Therapy)

सध्याच्या धकाधकीच्या वातावरणात आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला लगेच थकवा येतो आणि तणाव येतो. हा तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही म्यूझिक थेरपीची मदत घेऊ शकता.

म्यूझिक थेरपीच्या मदतीने मन आणि शरीर रिलॅक्स होते. काही संशोधनानुसार, म्यूझिक ऐकल्याने तणाव आणि नैराश्याची लक्षणे टाळण्यास मदत होते. शिवाय, या म्यूझिक थेरपीमुळे आपल्या मनातील एकाग्रता वाढते.

त्यामुळे, कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास मदत होते. दिवसभरातील तणाव आणि थकवा घालवण्यासाठी या म्यूझिक थेरपीचा अवश्य वापर करा.

Mental Health
Benefits Of Meditation : मेडिटेशन म्हणजे काय? नियमित केल्यावर होणार ‘हे’ आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com