All-Season Detox Tea: तुम्ही बाराही महिने पिऊ शकता हा काढा, सर्दी,खोकल्यासह वजन घटवण्यातही आहे फायदेशीर

All Rounder Detox Tea Recipe for Good Health: पावसाळ्यात या डिटॉक्स टीचे सेवन काढा म्हणून करू शकतो. तसेच सर्दी, खोल्यासारखे आजार झाल्यास दिवसभर याचे सेवन केले तर खूप प्रभावी ठरते.
All-Season Detox Tea
All-Season Detox Teasakal
Updated on

Detox Tea For Weight Loss And Belly Fat: पावसाळ्यात शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी अनेकजण विशेष पेये आणि आहाराची निवड करतात. मात्र, असे एक पेय आहे जे फक्त पावसाळ्यातच नव्हे तर बाराही महिने सेवन केले जाऊ शकते.

हे पेय केवळ चरबी कमी करण्यास मदत करत नाही, तर इतरही अनेक आरोग्य फायदे देते. तुम्हाला फिटनेससाठी प्रयत्नशील राहायचे असेल किंवा तुमच्या रोजच्या आहारात काहीतरी पोषणमूल्ययुक्त समाविष्ट करायचे असेल, तर हे पेय नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

हे आरोग्यदायी पेय पुदिना, दालचिनी, लिंबू, आलं, वेलची आणि पाण्याच्या मिश्रणाने तयार होते. यालाच डिटॉक्स टी असेही म्हणतात या घटकांमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीराला ताजेतवाने करण्यासोबतच अनेक आजारांपासून बचाव करतात.

All-Season Detox Tea
Solapur Bazaar Amti Recipe: वारी गाजवणारी सोलापूरची बाजार आमटी कशी जन्मली? लिहून घ्या स्पेशल रेसिपी

डिटॉक्स टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पाणी

  • पुदिना

  • दालचिनी

  • वेलची

  • लिंम्बू

  • आले

पुदिन्यामुळे पचन सुधारते, दालचिनी चयापचय वाढवते, लिंबाचा व्हिटॅमिन सी शरीराला ऊर्जा देते, तर आलं आणि वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करतात. हे पेय नियमित प्यायल्यास वजन कमी होण्यासही हातभार लागतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

All-Season Detox Tea
Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

डिटॉक्स टी बनवण्याची कृती

सर्वप्रथम भांड्यात आवश्यकतेनुसार पाणी घ्या. त्यात १-२ दालचिनी, ५-६ पुदिन्याची पाने, ३-४ वेलची, थोडे खिसलेले आले घाला. हा डिटॉक्स टी ५- १० मिनिटे उकळून घ्या. नंतर पाणी कोमट झाले आहे कि नाही तपामा आणि गाळून घ्या. आता त्यात चवीनुसार लिंबू पिळा आणि या देतोस टी चा आनंद घ्या.

पावसाळ्यात या डिटॉक्स टीचे सेवन काढा म्हणून करू शकतो. तसेच सर्दी, खोल्यासारखे आजार झाल्यास दिवसभर याचे सेवन केले तर खूप प्रभावी ठरते.

या व्यतिरिक्त इतर महिन्यांत या मिश्रणाचे उपाशी पोस्टी सेवन केले तर चरबी घटण्यास मदत होते आणि इतर आजारही टळतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com