
Thyroid Symptoms: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवतात. अनेकांना थायरॉईडचा त्रास होतो. हा आजार सामान्य बनला आहे. थायरॉईड हे गळ्याजवळ पुलपाखराच्या आकाराची असते. थायरॉईड ग्रंथी T4 आणि T3 हार्मोन्स स्रावित करते. हे हार्मोन्स चयापचय नियंत्रित करतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड हार्मोन तयार करू शकत नाही, तेव्हा या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात.
त्याच वेळी, जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त थायरॉईड हार्मोन तयार करते, तेव्हा या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. यामुळे, थायरॉईड रुग्णाला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. थायरॉईडची पुढील लक्षणे दिसल्यास चुकूनही दुर्लक्ष करु नका.