Health Tips : ॲसिडिटीचा त्रास होतोय? ट्राय करा 'हे' ५ रामबाण उपाय

टेन्शन, ट्रेसमुळे छातीत जळजळ, पोटात दूखणे, मळमळ, उलट्या, डोके दूखी असा त्रास ॲसिडिटी वाढल्याने होतो.
Health Tips
Health Tipsesakal

जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्लपित्त वाढल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो. आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लँड्समधून स्रवते व यामुळे अन्न पचन होते. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड अन्न पचनासाठी फार आवश्यक असते. पण प्रमाणापेक्षा जास्त स्रवले तर ॲसिडिटीचा त्रास होतो. यावर काही घरगुती रामबाण उपाय जाणून घेऊ.

Health Tips
Health Tips: 'या' घरगुती उपायांनी ताप घालवा

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये पोटाला आराम वाटावा असे गुणधर्म असतात. त्यामुळे थोड्याचवेळात ॲसिडिटीवर आराम मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असे तर तुळशीचा पाने चावून खा किंवा ३-४ पाने काढ्यात उकळून खा.

Health Tips
Health Tips : सालीसकट बदाम चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

बडीशेप

जेवणानंतर बडीशेप खाणे ही सनय चांगली आहे. यामुळे अन्न पचन चांगले होते. ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. बडीशेपचा काढा किंवा फेनेल टी प्यायल्यास आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. अपचन आणि पोट फूगत असेल तर बडीशेप हा त्यावरचा सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

Health Tips
Health Tips : 'या' दिशेला झोपल्याने पडतात वाईट स्वप्न, जाणून घ्या योग्य दिशा

दालचिनी

अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.

Health Tips
Health Tips : तुम्ही शुगर पेशंट आहात? 'या' रोपाची पाने ठरतात लाभदायक

ताजे ताक

छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून ताबडतोब आराम मिळतो.

Health Tips
Health Tips : अ‍ॅसिडिटीपासून आराम हवा असेल तर 'ही' फळे नक्की खा..

गुळ

गुळात मोठ्याप्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्यांची शक्ती वाढते. तसेच जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्नपचन चांगले होते. गुळामुळे आपला पचनसंस्था अल्कलाईन राहते व ॲसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो. उन्हाळ्यात तर गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे तापमान नियमित राखण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com