
मध्यंतरी एका व्यक्तीला भेटायला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. लिफ्ट नसल्याने जिना चढत जात असताना पाहिले तर कोपऱ्यांत सगळीकडे लाल रंग पिचकारी मारल्यासारखा दिसत होता. ज्यांच्याकडे गेलो ते गृहस्थ ओशाळून म्हणाले, “अहो, येथे अनेक लोक पान, गुटखा खाऊन येता-जाता थुंकत राहतात. पान, तंबाखू, गुटखा व सिगरेट ओढण्याच्या लोकांच्या या सवयीमुळे आमच्या इमारतीची दुर्दशा झालेली आहे.” लोकांची ही वाईट सवय कशी सोडवावी हे कळत नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की सिगरेट ओढणे, तंबाखू-गुटखा खाणे या सवयी चुकीच्या असल्या तरी विडा वा पान खाणे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.