Tonsils: थंडीच्या काळात टॉन्सिलच्या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी 'हे' उपाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tonsils

Tonsils: थंडीच्या काळात टॉन्सिलच्या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी 'हे' उपाय करा

हिवाळ्यात टॉन्सिलिटिस हा जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे होऊ शकतो.

सुरूवातीला बघू या टॉन्सिलिटिस म्हणजे काय?

टॉन्सिलिटिस हा टॉन्सिल्सना म्हणजे घशाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पेशींच्या दोन पुंजक्यांना होणारा संसर्ग होय. हा संसर्ग सामान्यपणे विषाणूंमुळे होतो. पण कधी-कधी तो जीवाणूमुळेही होऊ शकतो. स्ट्रेप्टोकॉकसच्या 'अ' गटातील जीवाणूंमुळे हा संसर्ग झाल्यास त्याला 'स्ट्रेप थ्रोट' असं म्हणतात. बहुतांश लोकांमध्ये औषधं न देताही काही दिवसात हा संसर्ग बरा होतो. बहुतांश लक्षणं सात ते दहा दिवसांमध्ये नाहीशी होतात.

हेही वाचा: Winter Recipe: आरोग्यवर्धक लवंगी चहा कसा तयार करायचा?

1) कांदा नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टॉन्सिलिटिस होणा-या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. कांदा रस काढुन त्यांचे सेवन करा.

2) मेथी दाणे तुमच्या घशातील कफ तोडण्यास मदत करतात.मेथीचे दाणे भिजवून त्यांची पेस्ट गरम पाण्यात उकळून पिण्यास खशाला आराम मिळेल.

हेही वाचा: Winter Recipe: वजन कमी करणारा आरोग्यवर्धक चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवायचा?

3) मॅग्नेशियम समृद्ध असलेल्या मोहरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे टॉन्सिलच्या लक्षणे हाताळण्यास मदत करते. एक ग्लास गरम पाण्यात मोहरीची पावडर टाकून कुस्करल्यास टॉन्सिलिटिस बरा होतो.  

4) आल्याचा जिंजरॉल नावाचे संयुग असते, जे टॉन्सिलिटिस बरे करण्यासाठी चांगले आहे. एक कप गरम आल्याचा चहा प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

5) मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने त्रास कमी होऊ शकतो.

टॅग्स :lifestyleWinterhealth