- डॉ. मालविका तांबे
योग म्हटले की लोकांसमोर व्यायामाची किंवा योगासनांची चित्रे डोळ्यांसमोर येतात. २१ जून २०१५ हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. खरे तर योग म्हणजे शरीर व मनामध्ये तारतम्य व संतुलन साधता येईल अशी प्रक्रिया.
याच्याने अगदी सूक्ष्म स्तरावर मन व शरीर तसेच मनुष्य व निसर्ग यांच्यात हार्मनी यायला मदत मिळते. अकरावा योगदिवस हा One earth-one health अशा ध्येयानुसार साजरा केला जात आहे. योग हा शब्द युज् अर्थात जोडणे या संस्कृत शब्दावरून आलेला आहे.