
थोडक्यात
डोनाल्ड ट्रम्प यांना क्रोनिक व्हेनस इन्सफिशिएन्सी (CVI) असल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले, ही एक सामान्य वयोसापेक्ष स्थिती आहे.
त्यांच्या हातावरील सूज ही हातमिळवणीमुळे ऊतकांवर दडपण आल्यामुळे झाली असून, त्यात कोणतीही गंभीर बाब आढळली नाही.
CVI ही नसांशी संबंधित स्थिती असून नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि पाय उंच ठेवणे यांसारख्या उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते.
White House Clarifies Trump Swelling: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे क्रोनिक व्हेनस इन्सफिशिएन्सी (Chronic Venous Insufficiency – CVI) या आजाराशी सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा आजार नेमका काय आहे चला तर जाणून घेऊयात
हा आजार मुख्यतः नसांशी संबंधित असून विशेषतः पायांमध्ये सूज निर्माण होण्याचं कारण ठरतो. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी स्पष्टीकरण देताना सांगितलं की ही स्थिती गंभीर नसून, वयाच्या वाढीमुळे होणारा एक सामान्य त्रास आहे.