Health: Acidity दूर करण्यासाठी खास रामबाण उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Acidity

Health: Acidity दूर करण्यासाठी खास रामबाण उपाय

आपल्याकडे अन्नपदार्थांमध्ये तेल आणि मसाले भरपूर टाकले जातात आणि हे पदार्थ हवे तेवढे खाल्लेही जातात. आपल्यापैकी अनेक लोक पोटाच्या आरोग्यापेक्षा जिभेचे चोचले पुरवण्यावर जास्त भर देतात. अशात या लोकांच्या शरीरात गॅस, पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी अशा आजारांना घर करण्यास जागा मिळते. या समस्या लग्नाचा सीझन आणि उन्हाळ्यात अधिक वाढतात. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

● दही अ‍ॅॅॅॅसिडिटीकरीता फायदेशीर आहे.

आयुर्वेदात जेवण केल्यानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यातसोबत भाजलेलं जीरं पचनक्रियेला बूस्ट करतं. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्स लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया अ‍ॅसिडिटीला कमी करण्यासोबतच आतड्यांना अन्न पचवण्यास मदत करतं.

● ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे.

काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, किशमिश, खजूर, सुपारीसारखे ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. याने पचनक्रिया मजबूत करण्यास मदत मिळते.

● जेवणानंतर कोमट पाणी प्यावे.

जर तुम्हाला वाटत असेल की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला जुलाब होऊ नये तर जेवणानंतर कोमट पाणी नक्की प्यावं. कोमट पाण्याने पचनक्रिया वेगाने आणि सहजपणे होते.

हेही वाचा: Health Tips : अ‍ॅसिडिटीपासून आराम हवा असेल तर 'ही' फळे नक्की खा..

● चहा, कॉफी नाही तर ग्रीन टी फायदेशीर ठरु शकतं.

जेवणानंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. यात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतं, जे पचनक्रियेत ऑक्सीडेटिव लोडला संतुलित करण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सीडेंट बनवतं.

● फायबर युुक्त अन्न खावे त्याने पोट राहतं साफ राहतं.

जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हलकं आणि फायबरयुक्त जेवण पोटासाठी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. फायबरयुक्त आहार पोटाची सफाई करण्यास मदत करतं. तसेच तेलकट खाल्ल्यानंतर पचनक्रियेचं झालेलं डॅमेजही कंट्रोल करतं. अशात दलिया आणि ओट्सचं सेवन करावं.

● ओव्याने पोट राहतं थंड राहते.

ओव्याचं पाणी जेवण केल्यानंतर गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. ओवा थंड असतो. कोमट पाण्यात एक चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात.

Web Title: Try This Special Home Remedy To Get Rid Of Acidity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..