
नागपूर : क्षयाचे भय कमी होण्याऐवजी ते अधिक भयावह होत आहे. क्षयाच्या उच्चाटनासाठी शासनस्तरावर सर्वोतपरी प्रयत्न होतात, मात्र यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. प्रधानमंत्री यांनी २०२५ पर्यंत क्षयाच्या उच्चाटनाचे स्वप्न बघितले होते. परंतु याला खीळ बसली आहे. मागील साडेपाच वर्षांत नागपुरात मृत्यूचा आकडाही फुगला असून १हजार ५४९ क्षयग्रस्त दगावले. उपराजधानीतील आकडेवारीवरून क्षयाचे विदारक चित्र पुढे आले आहे.