

Tuberculosis is spreading beyond the lungs, and doctors warn early diagnosis is crucial.
sakal
Tuberculosis Alert: क्षयरोग आता फक्त फुप्फुसाचा आजार नाही; शरीराच्या जवळपास प्रत्येक भागात आता क्षयरोगाचा संसर्ग पसरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. फक्त दात, केस आणि नखे वगळता हा संसर्ग आता मेंदू, हाडे, मूत्रपिंड, त्वचा, लसिका ग्रंथी आणि पुनरुत्पादक अवयवांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आत्ता क्षयरोग प्राणघातक ठरत असून, कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय रुग्णाचे शरीर अधिक कमजोर बनत आहे.