
Tulsi water remedy for cold and cough: पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो, पण त्यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या दिवसांमध्ये सर्दी, ताप, अन्नातून विषबाधा, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि अतिसार यांसारख्या आजारांचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात तुळशीचे पाणी समाविष्ट करू शकता. तुळशीचे पाणी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आयुर्वेदात शतकानुशतके तुळशीचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. त्याचे नियमित सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.