- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
भारत हा डायबेटिक कॅपिटल आहे. आज प्रत्येक घरात कुणालातरी ‘शुगर’ आहेच. सध्या भारतात सुमारे सात कोटी सत्तर लाख लोक टाइप २ डायबिटीजने ग्रस्त आहेत. टाइप २ डायबेटिस हा एक सामान्य; पण गुंतागुंतीचा आजार आहे. तर असा हा टाइप २ डायबेटिस पूर्णपणे जेनेटिक (आनुवंशिक) आहे, की फक्त जीवनशैलीशी संबंधित आहे?