Types Of Cancer : जीवघेण्या कॅन्सरचे प्रकार नेमके किती? WHO ने जाहीर केली यादी

कॅन्सर एक जीवघेणा गंभीर आजार
Types Of Cancer
Types Of Canceresakal

Types Of Cancer : कॅन्सर एक गंभीर आजार आहे, या आजाराला सगळेच घाबरतात पण अजूनही कॅन्सर बद्दल आपण पूर्णपणे जागरूक आहोत असं नाही. साधारण आपण लिव्हर कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, लंग्स कॅन्सर, ब्लड कॅन्सर, माऊथ कॅन्सर, स्कीन कॅन्सर ही नाव जास्त ऐकतो. पण एवढेच कॅन्सरचे प्रकार आहेत का? नाही. यापल्याडही कॅन्सरचे प्रकार आहेत. साधारण बहुदा आपण विचार न केलेल्या शरीराच्या भागातही कॅन्सर होऊ शकतो.

Types Of Cancer
Selfie Types : चर्चेत राहण्यासाठी अनेकजण घेतात 'या' सेल्फींचा आधार

कॅन्सर झाला म्हणजे नक्की काय?

आजकालच्या मॉडर्न जगात आणि विचित्र लाइफस्टाईल मध्ये असे अनेक आजार आहेत जे आपल्या आजूबाजूला असतात, पण त्यातला गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. जेव्हा आपलं शरीर नवीन पेशी बनवत तेव्हा जुन्या खराब पेशी आपोआप नष्ट करत. पण जेव्हा कॅन्सर शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीरातला पांढऱ्या आणि लाल पेशींचा बॅलेन्स बिघडायला लागतो आणि खराब पेशी शरीरातून नष्ट होत नाहीत.

Types Of Cancer
Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

जशा जशा खराब पेशी वाढू लागतात त्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये बदलू लागतात आणि कॅन्सरची लागण वाढते. WHO च्या मते कॅन्सर हे जगातल्या काही गंभीर आजारांपैकी एक आहे. त्यांच्या सऱ्व्हेनुसार, साधारण प्रत्येका 6 व्या माणसात कॅन्सर आढळतो. रिसर्चर कॅन्सर वरती सातत्याने रिसर्च करत आहेत.

Types Of Cancer
Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

या कारणामुळे 33% लोक कॅन्सरने मरतात.

WHO नुसार, जवळजवळ 33 % लोकांचा मृत्यू हा तंबाकू खाणं, दारू पिण, बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) जास्त असणं, फळ आणि भाज्या न खाणं यामुळे होतो.

Types Of Cancer
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील

कॅन्सरचे प्रकार

कार्सिनोमा हा एक कॅन्सर आहे जो त्वचेत किंवा इतर अवयवांमध्ये असणाऱ्या टिशूजने होतो.

सारकोमा हा हाडे, स्नायू, कार्टिलेज, ब्लड सेल्सशी संबंधित कॅन्सर आहे.

ल्युकेमिया हा बोन मॅरोचा कॅन्सर आहे.

लिम्फोमा आणि मायलोमा हे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होणारे कॅन्सर आहेत.

Types Of Cancer
Hair Transplant : सीआयडीफेम दमदार हिरोही होता या आजाराने त्रस्त; त्याचा नवा लूक बघितला का?

या व्यतिरिक्तही कॅन्सरचे इतर प्रकार आहेत:

अपेंडिक्स कॅन्सर

ब्लड कॅन्सर

ब्रेन कॅन्सर

हाडांचा कॅन्सर

गर्भाशयाचा किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर

कोलोरेक्टल कॅन्सर

डुओडनल कॅन्सर

कानाचा कॅन्सर

एंडोमेट्रियल कॅन्सर

अन्ननलिकाचा कॅन्सर

हृदयाचा कॅन्सर

गॉल ब्लेडरचा कॅन्सर

किडनीचा कॅन्सर

स्वरयंत्राचा कॅन्सर

ओठांचा कॅन्सर

लिवर कॅन्सर

फुफ्फुसाचा कॅन्सर

लिम्फोमा

मेसोथेलियोमा

मायलोमा

तोंडाचा कॅन्सर

वजाइनल कैंसर

स्वादुपिंडाचा कॅन्सर

त्वचेचा कॅन्सर

लहान आतड्याचा कॅन्सर

पोट किंवा जठरासंबंधीचा कॅन्सर

टेस्टिक्युलर कॅन्सर

थायरॉईड कॅन्सर

वजाईनल कॅन्सर

Types Of Cancer
Types of Diabetes : मधुमेहाचा कोणता प्रकार आहे सर्वांत घातक ?

कॅन्सर कितीही गंभीर आजार असला तरीही आपल्याकडे यावर उपचार होतात आणि अनेक लोक बरीही होतात. जर रोगी याच्या पहिल्या स्टेजला असेल तर त्याला याचा तितका त्रास होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com