Spine Surgery
sakal
- डॉ. अजय कोठारी, स्पाइन तज्ज्ञ
‘डॉक्टर, ऑपरेशन करायचं म्हणताय... पण नेमकं कोणतं ऑपरेशन?’ स्पाइन सर्जरीचा विषय निघाला की अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. काहींना वाटतं, की स्पाइनचं एकच ऑपरेशन असतं, तर काहीजण इंटरनेटवर डिस्केक्टॉमी, फ्युजन, TLIF, एंडोस्कोपी, डिकम्प्रेशन अशी नावं वाचून अधिकच गोंधळून जातात.
खरं तर स्पाइनच्या प्रत्येक समस्येसाठी एकच शस्त्रक्रिया योग्य नसते. प्रत्येक आजारासाठी एकच औषध नसतं, तसंच प्रत्येक रुग्णासाठी एकच स्पाइन सर्जरीही नसते. म्हणूनच सर्वांत आधी स्पाइन सर्जरीचे वेगवेगळे प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे.