Unilateral Biportal Endoscopy : ज्येष्ठांसाठी फायदेशीर : यूबीई एंडोस्कोपी

UBE Endoscopy A Modern Option for Selected Spine Conditions: मणक्याची शस्त्रक्रिया आता अधिक आधुनिक; ज्येष्ठांसाठी यूबीई एंडोस्कोपी किती फायदेशीर?
Advanced UBE Endoscopy for Elderly Patients Learn About Its Benefits Procedure and Recovery for Selected Spine Conditions

Advanced UBE Endoscopy for Elderly Patients Learn About Its Benefits Procedure and Recovery for Selected Spine Conditions

sakal

Updated on: 

-डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन

डॉक्टर, बाबांचं वय ७५ आहे. दहा पावलं चाललं की पाय भरून येतात, बसावं लागतं. पण या वयात मोठं ऑपरेशन झेपेल का?’’ अशी काळजी घेऊन येणारी अनेक कुटुंबं आम्ही रोज पाहतो. वय वाढलं, की मणक्याचे आजार वाढतात; पण त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब असे इतर आजारही असतात.

त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेची भीती वाटणं स्वाभाविक आहे. अशा रुग्णांसाठी ‘यूबीई एंडोस्कोपी’ हे आधुनिक तंत्र एक सुरक्षित पर्याय ठरत आहे.

वयानुसार मणक्यातील डिस्क झिजते, सांधे जाड होतात आणि लिगामेंट फुगतात. यामुळे नसांची नलिका हळूहळू अरुंद होते. याला ‘लंबर कॅनाल स्टेनोसिस’ म्हणतात. याची लक्षणं ओळखण्यासारखी असतात:

Loading content, please wait...