

Diabetes and other health problems
sakal
Diabetes Side Effects On Other Organs: आधुनिक जीवनशैलीमधील दोषांमुळे वाढणाऱ्या मधुमेहाचे आजमितीला जगभरात 38 कोटी रुग्ण आहेत. त्यातील निम्मे म्हणजे 19 कोटी, त्याबाबतीत काहीही काळजी घेत नाहीत. कारण, "मला काही त्रास होत नाही, मग मी कशाला औषधे घ्यायची?' असा त्यांचा सवाल असतो.
मात्र वरवर काहीही त्रास होत नाही, म्हणून मधुमेहावर व्यवस्थित उपचार न घेतल्यास किंवा अर्धवट उपचार घेऊन तो अनियंत्रित ठेवल्यास, रुग्णाचे शरीर तो आतून पोखरत राहतो. मधुमेह नियंत्रणात न ठेवल्याने रक्तातील वाढत राहिलेली साखर शरीरातील अवयवांवर आणि विविध कार्यसंस्थांवर छुप्या रुस्तुमप्रमाणे हल्ले करत राहते आणि काही कालांतराने अनेक गंभीर आरोग्यसमस्या उभ्या ठाकतात. यामुळेच मधुमेहाला "सायलेंट किलर' अशी उपाधी आहे.