Explained: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोलेस्टेरॉलला समजून घ्या! समज, गैरसमज आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली  

Everything to Know About Cholesterol to Avoid Heart Attack: कोलेस्टेरॉलविषयी गैरसमज दूर करून योग्य आहार, व्यायाम व जीवनशैलीतून हृदयविकाराचा धोका कमी करा.
Everything to Know About Cholesterol to Avoid Heart Attack

Everything to Know About Cholesterol to Avoid Heart Attack

sakal

Updated on

Cholesterol Myths & Facts: कोलेस्टेरॉल हा शब्द बहुतेकांनी ऐकलेला आहे. आधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे रक्तात कोलेस्टेरॉल असतेच. हा एक स्निग्ध पदार्थ आहे व तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे एकात्मक साधण्यासाठी आवश्‍यक घटक आहे. उदाहरणार्थ- यकृत व मेंदू. हे कोलेस्टेरॉल शरीरामधील कॉर्टिझोन व लैंगिक हार्मोन्स तयार करण्यास आवश्‍यक असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलशिवाय आपले काहीही चालणार नाही; पण रक्तातील त्याची पातळी योग्य ठेवणे मात्र गरजेचे असते.

कोलेस्टेरॉल म्हणजे काय? व ते का धोकादायक आहे? याबाबत जाणून घेऊन त्याविषयी गैरसमज न करून घेता ते कसे कमी करता येऊ शकते, याविषयी फारच थोड्या जणांना माहिती असते. कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी वाढली, की इतर स्निग्ध पदार्थांसोबत (लिपिड) ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि ऍथरोमाचा प्लाक निर्माण करते. त्यामुळे हार्ट ऍटॅकचा धोका संभवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com