डॉ. मालविका तांबेलहान मुलांना पोषण कमी पडत असल्यास व त्यांना भूक लागत नसल्यास त्यामागची कारणे व लक्षणे याप्रमाणे असतात. .१ मुलाचे वजन कमी होत राहणे, तसेच वयाच्या हिशेबाने वजन कमी असणे.२ मूल वारंवार आजारी पडणे.३ मुलाच्या सतत थकवा, कुरकूर, चिडचिड अशा तक्रारी चालू असणे.४ पोटात सतत दुखत राहणे किंवा पोटात काही तरी होते आहे असे मुलाने सांगणे.५ कुठेही जखम झाल्यास ती लवकर भरून न येणे.६ कुठल्याही गार गोष्टीला मुलाने हात लावायला नकार देणे.७ अकारण घाम येणे.८ केस गळणे व नखे तुटणे.९ मुलांच्या पोटात कृमी होणे.१० परिवारामध्ये मधुमेह व थायरॉइडसारखा एखादा चयापचय क्रियांसंबंधित आजार असल्यासही मुलांना भूक लागत नाही..अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास व मूल पोटभर जेवत नसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.भूक वाढविण्यासाठी काही उपायमुलाचा जन्म झाल्यापासूनच त्याच्या पचनावर व त्याला कुठलाही संक्रामक रोग होऊ नये यासाठी आयुर्वेदात खूप विचार केला गेला आहे.साधारण १५ ते २० वनस्पती एकत्र करून आपल्याकडे बाळगुटी देण्याची पद्धत आहे. बाळगुटीत असलेली द्रव्ये पचन सुधारण्यासाठी, अग्नीवृद्धी करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी तसेच कृमींशी भांडायला मदत करतात. .त्यामुळे अगदी लहान वयापासून मुलांना बाळगुटी देणे सुरू करावे. संतुलन बाळगुटी द्यायला अत्यंत सोपी असते, रोज रोज उगाळण्याची गरज नसते, तसेच कुठल्या द्रव्याची किती मात्रा द्यावी याचा विचार करावा लागत नाही. संतुलन बाळगुटी जन्म झाल्यापासून साधारण १५ महिन्यांपर्यंत नियमितपणे द्यावी. ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जन्मापासून सुरू करायला हरकत नाही.मुलांच्या सुरुवातीच्या काळात जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्या. साधारणपणे २-३ तासांनी मुलाला थोडे थोडे खायला द्यावे..दोन जेवणांमधील अंतर २ ते ३ तास नक्की असावे.मुलांना कुठल्याही प्रकारचे जंक फूड, बाजारातून आणलेल्या पॅक्ड गोष्टी किंवा पेय पदार्थ देऊ नयेत.घरच्यांनी किंवा आई-वडिलांनी चुकीच्या गोष्टी मुलांना देऊ नयेत. चांगला आहार व वाईट आहार यांच्यातील फरक मुलांना गोष्टींमधून, गप्पांमधून सांगत राहावे. आपणच चुकीची गोष्ट मुलांच्या हातात आणून दिल्यास गोष्ट वाईट आहे हे त्यांना कधीच जाणवत नाही.मूल जेवत असताना घरातील टीव्ही किंवा मोबाइल घरातील प्रत्येकानेच बंद ठेवणे चांगले.मोठे ज्या नियमांचे पालन करतात ते नियम मुले पाळायला तयार असतात, पण मोठ्यांनीच नियम पाळले नाहीत तर ते नियम मुले पाळत नाहीत असे दिसते..जेवल्यानंतर मुलांना ताक पिण्याची सवय लावावी. ताकात जिरे पूड, हिंग, काळे मीठ घालून प्यायला दिल्यास पुढच्या जेवणापर्यंत नीट भूक लागायला मदत मिळते.मुलांच्या भाज्या तेलकट व चमचमीत करू नयेत. भाज्या बनविताना जिरे, हिंग, आमसूल, कढीपत्ता, सुंठ, मिरी, आले वगैंरेंचा वापर करावा.मुलांचा आहार हलका पण चविष्ट असावा.मुलांच्या आहारात कोथिंबीर, पुदिना, आले, खोबरे वगैरेंपासून बनविलेल्या चटण्या, तसेच घरगुती लोणचे थोड्या प्रमाणात द्यायला हरकत नाही..भूक नाही असे मुलांना म्हटल्यास त्यांना काहीतरी चमचमीत देण्याऐवजी मुगाची पातळ खिचडी, मऊ भात, लाह्यांचा फांट वगैरे द्यावे.अशा प्रकारे मुलांना थोडी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर selective अरुची आहे की खरी अरुची आहे की मंदाग्नी आहे हे आई-वडिलांना कळू शकेल. तज्ज्ञांकडे जाऊन काही औषधोपचार करण्याची गरज आहे का हेही समजू शकेल.विशिष्ट नावडी (Specific dislikes)एखाद्या मुलाला लहानपणापासूनच काही विशिष्ट गोष्ट आवडत नाही. उदा. काही मुले दूध प्यायला नकार देतात, काही मुले भात खायला नकार देतात, काहींना पोळी आवडत नाही. अशा वेळी दूध न आवडणाऱ्यांना खीर करून देणे, संतुलन चैतन्य कल्प, अमृतशर्करा वगैरे दुधाचा वास व चव बदलणारी गोष्ट त्यांच्या दुधात घालणे वगैरे युक्ती केल्यास मुले दूध पितात. त्यांच्या पोळीची कणिक दुधात मळावी. असे केल्याने त्यांच्या पोटात दूध जायला मदत होते..भाताऐवजी घावन देणे, थालीपिठात तांदळाचे पीठ घालणे, गहू आवडत नसल्यास मिश्र धान्यांची पोळी वा भाकरी देणे, शिरा देणे वगैरे युक्ती योजता येते. मुलांना जी गोष्ट आवडत नाही ती वेगळ्या प्रकारे मुलांच्या पोटात जाईल याची काळजी मोठ्यांनी घ्यावी.भाज्या आवडत नसल्यास मात्र हा नियम लागू होत नाही. कारण भाज्यांध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात, त्यातील एखादी भाजी आवडत नसल्यास ती भाजी टाळणे योग्य, पण कुठलीच भाजी आवडत नाही या कारणामुळे सगळ्याच भाज्या टाळणे हे चूक..मुलांना भाज्यांच्या चवीची सवय लागावी यासाठी मूल ७-८ महिन्यांचे झाल्यापासून त्याला भाज्यांचे सूप, वाफवलेल्या वा रोस्ट केलेल्या भाज्या, कटलेट-ठेपले वगैरेंच्या रूपात देता येतात.एकूणच कुठलाही गोष्ट आवडत नसली तर काहीतरी पर्यायी मार्ग शोधून काढावा. असे केल्याने अमुक वस्तू मुलाला पचत नाही का, त्याला अमुक गोष्टीमुळे ॲलर्जीचा त्रास होतो का हे कळू शकते. एखादे मूल एखाद्या अन्नपदार्थाला ॲलर्जिक असले तर त्याच्या ॲलर्जीवर काम करावे व वैद्याच्या सल्ल्याने थोड्या थोड्या प्रमाणात ती गोष्ट मुलाच्या आहारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा.पचनसंस्थेवर काम केल्यास लॅक्टोज इन्टॉलरन्स, ग्लुटेन इन्टॉलरन्स वगैरेंसारख्या गोष्टी बऱ्या होतात असा आमचा कार्ला येथील अनुभव आहे..याचबरोबरीने पचन सुधारण्याच्या दृष्टीने संतुलन बाल हर्बल सिरप, सॅन अग्नी सिरप, बिल्वसॅन, कुमारी आसव, अरविंदासव, वगैरे देण्याचा फायदा मिळू शकतो. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे उत्तम.मुलांचे पोट नीट साफ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या पोटाला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल लावणे, शीच्या जागी व नाभीमध्ये २-२ थेंब एरंडेल लावणे याचाही फायदा होताना दिसतो.एकूणच मुलांच्या वाढत्या वयात भुकेची नक्की काय परिस्थिती आहे याचा विचार करून त्यांना आहारातून पूर्ण पोषण मिळेल याची खबरदारी घेणे आवश्यक असते. भूक लागत नाही या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.