- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
तुम्ही कधी अनुभवलंय का, की जेवण झाल्यावर लगेच पुन्हा काहीतरी गोड, कुरकुरीत किंवा खारट खावंसं वाटतं? किंवा दुपारनंतर ४-५ वाजता भूक लागते, मूड चिडचिडा होतो आणि वाटतं की एक कप चहा काही स्नॅक्स खाल्ल्याशिवाय ऊर्जा मिळणारच नाही?
याला फंक्शनल मेडिसिनमध्ये ब्लड शुगर रोलरकोस्टर म्हटलं जातं, आणि हेच तुमच्या अविरत क्रेविंग्जमागचं खरं कारण असू शकतं.