
गौरी शिंगोटे
दुकानात काही खाद्यवस्तू घ्यायला गेल्यास उत्पादनांवरील आरोग्य दावे, घटकांची यादी आणि गोंधळात पाडणारी परिभाषा यामुळे चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटते. बऱ्याच उत्पादनांवर ‘नैसर्गिक’, ‘लो-फॅट’ किंवा ‘साखर-विरहित’ असे दावे केले जातात; पण याचा खरा अर्थ काय समजावा? खाद्यपदार्थावरील लेबल समजून घेणे हीच तुम्ही स्वतः व तुमचे कुटुंबीय यांच्यासाठी निरोगी पर्याय निवडण्यासाठी गुरुकिल्ली आहे. सर्वसाधारण खाद्य-लेबलांचा अर्थ, त्यांना कसे समजावे आणि यातील दिशाभूल करणारे दावे कसे ओळखावेत याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे.