

Demystifying Schizophrenia: Beyond Myths and Superstitions
Sakal
डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
२४ मे रोजी ‘स्किझोफ्रेनिया जनजागृती दिन’ पाळला जातो. या आजाराविषयी समाजात अजूनही कलंकितपणाची भावना आणि भीती दिसते. पण घरच्या लोकांचे सहकार्य आणि योग्य उपचारांच्या साह्याने रुग्ण व्यक्ती पुन्हा चांगले आयुष्य जगू शकते.
मंजू २६ वर्षांची होती. तिचे लग्न झालं होतं, दोन मुलंही होती. नवरा आणि सासरच्या मंडळींबरोबर ती एका छोट्या गावात राहत होती. नवरा शेती करायचा. आठ महिन्यांपूर्वीपर्यंत ती ठीक होती. पण नंतर तिला ‘स्किझोफ्रेनिया’ची (छिन्नमानसिकता) लक्षणं दिसू लागली. तिचं वागणं विचित्र होऊ लागलं. तिला आपल्या कुटुंबावर विश्वास राहिला नाही. कोणीतरी तिला इजा करणार आहे, तिला मारणार आहे, तिला असं वाटायचं. तसे आवाज ऐकू यायचे. कधी कधी भयानक राक्षसांचे भास व्हायचे.