आरोग्य‘चेतना’: मणक्यांमधील डिस्क ‘घसरते’ तेव्हा...

स्लिप्ड डिस्क ही दुर्मीळ नव्हे तर सर्वसामान्य; कंबरदुखीपासून साएटिका, पायातील बधिरपणा आणि मूत्राशयावरील नियंत्रण गमावण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, कारणं आणि टप्प्याटप्प्याने वाढणारी लक्षणं उलगडणारा लेख
Spine Anatomy: Understanding the Structural Role of Discs as Shock Absorbers

Spine Anatomy: Understanding the Structural Role of Discs as Shock Absorbers

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

आपल्या पाठीचा कणा म्हणजे फक्त हाडांची रांग नाही. साध्या शब्दात सांगायचं, तर प्रत्येक दोन मणक्यांच्यामध्ये एक छोटी; पण अत्यंत महत्त्वाची ‘उशी’ असते - त्यालाच आपण ‘डिस्क’ म्हणतो. ही डिस्क धक्का शोषून घेते, मणक्याला लवचीकता देते, आणि दोन मणक्यांमधील थेट घर्षण टाळते. ही डिस्क काही कारणांनी घसरते, तेव्हा साध्या कंबरदुखीपासून मूत्राशयावरील नियंत्रण पूर्णपणे जाण्यापर्यंत अनेक गुंतागुंती उद्‍भवू शकतात. आपण याला ‘डिस्क प्रोलॅप्स’ किंवा ‘स्लिप्ड डिस्क’ म्हणून ओळखतो. ही जगभरातील लाखो माणसांना भेडसावणारी कॉमन; पण गैरसमजात अडकलेली समस्या आहे. ‘डिस्क घसरणे’ ही समस्या दुर्मीळ नाही. जगभरातील ५ ते २० टक्के प्रौढ व्यक्तींना आयुष्यात एकदा तरी याचा त्रास होतो, असं रिसर्च दाखवतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com