
डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठरावीक वेळेत स्वेच्छेने अन्नसेवन न करता शरीराला उपवासाच्या (Fasted) अवस्थेत ठेवण्याची प्रक्रिया. पारंपरिक आहारपद्धतींमध्ये दिवसभर अन्नसेवन करण्यावर भर असतो, तर इंटरमिटंट फास्टिंगमध्ये उपवास (म्हणजे काहीही न खाणे) आणि आहाराचे वेळापत्रक ठरवले जाते.
लठ्ठपणा, मधुमेह, पीसीओएस, थायरॉइड, उच्च रक्तदाब अशा दीर्घकाळ चालणाऱ्या रोगाच्या मुळाशी जाऊन उपाय शोधायला लागतो, तेव्हाच त्या रिव्हर्स होतात, त्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग उपयुक ठरते. चयापचय, हार्मोन्सचे संतुलन, दाह किंवा सूज (Inflammation), आणि पेशींची पुनरुत्पत्ती यांसारख्या प्रक्रिया सुधारण्यासाठी फास्टिंग प्रभावी ठरते.