- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कर्करोगाचं निदान केवळ शरीरावरच नाही, तर मनावरही घाव करतं. उपचारांचा प्रवास सुरू होतो - शरीरासाठी, पण मनासाठी काय?उपचारांइतकंच कठीण असतं ते स्वतःला दोष देणं थांबवणं. ‘माझं काय चुकलं?’, ‘कदाचित मी थोडी काळजी घेतली असती तर’, ‘माझ्याच नशिबी का?’, ‘आता माझं कसं होणार?’... ही वाक्यं कुणी उच्चारत नाहीत; पण ती मनात सतत चालूच असतात.