
Balanced Diet Tips: युनिसेफ इंडियाने 'मेरी थाली सेहतवाली' डिजिटल मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत तुम्ही आणि तुमचे कुटुंब निरोगी आहार आणि त्याच्या पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरूक होऊ शकता. भारताला चांगले पोषण देण्यासाठी आणि खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी हे आणखी एक देशव्यापी पाऊल आहे. या डिजिटल मोहिमेचा उद्देश आकर्षक पोस्ट, व्हिडिओ आणि जिंगल्सद्वारे संदेश घराघरात पोहोचवणे आहे.