

uttar pradesh government doctors retirement age 70 years
esakal
उत्तर प्रदेशातील सरकारी डॉक्टरांसाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर फेरनियुक्तीच्या माध्यमातून सरकारी डॉक्टरांना आता वयाच्या ७० वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांमध्ये गट ‘क’मधील २,५०० पदांवर भरती करण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, मानधनातील तफावतीविरोधात लखनौमध्ये आंदोलन करणाऱ्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधील सात निवासी डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.