

Upchar Adnyatacha: The Scientific and Spiritual Philosophy of Pitru Paksha and Ganeshotsav
Sakal
जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी संस्कृतीचे योगदान अनमोल असते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना, त्यामागचे विज्ञान समजून घेताना तर ही गोष्ट अधिकच पक्की होत जाते. पितृपक्ष हा पंधरवड्याचा कालावधी भारतीय संस्कृतीने जणू अज्ञाताला, भौतिक इंद्रियांनी किंवा पुस्तकी ज्ञानाने जे समजून घेता येत नाही, पण जाणवू शकते त्याला समर्पित केलेला दिसतो.