

Understanding Urinary Tract Infections (UTI)
Sakal
डॉ. मालविका तांबे
मूत्र अर्थात युरिन हा शरीरातला एक मल असतो. शरीरात गरजेचे नसलेले काही द्रव्य शरीर खूप विचारपूर्वक या मूत्राच्या माध्यमातून बाहेर फेकत असतो. ही प्रक्रिया सामान्य असते, त्यामुळे सहसा मूत्रत्याग व्यवस्थित होत असला, तर कोणीच याच्याकडे फारसं विशेष लक्ष देत नाही. पण जर का पाणी कमी प्यायलं गेलं किंवा कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला, की ही सामान्य प्रक्रिया पण खूप त्रासदायक ठरायला लागते.