Urine colour Change: तुम्हालाही या रंगाची लघवी होतेय का? वेळीच सावध व्हा; असू शकतात हे गंभीर आजार

तुमच्या लघवीचा रंगही एखाद्या गंभीर आजाचा ईशारा देत असते
Urine colour Change
Urine colour Changeesakal

Dengerous Diseases Signs: आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला लहान मोठे बरेच त्रास जाणवतात. ते रोजचे झाल्याने आपल्यालाही त्याबाबत नवीन वाटत नसल्याने आपण टाळाटाळ करतो. मात्र काही संमस्या गंभीर आजाराचे कारण ठरू शकते. होय, तुमच्या लघवीचा रंगही एखाद्या गंभीर आजाचा ईशारा देत असते. मात्र याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

लघवीचा रंग जितका गडद असेल तितका शरीरातील आजारांचा अधिक धोका असतो. तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेटेड (Dehydrated) असताना लघवीचा रंग खूप गडद आणि हलका तपकिरी असतो. कधी कधी काही खाल्ल्याने किंवा औषधांनी देखील तुमच्या लघवीचा रंग बदलत असतो. अनेक वेळा लघवीचा रंग आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगत असतो. चला तर जाणून घेऊया लघवीचा कोणता रंग आजारांना निमंत्रण देणारा ठरू शकतो ते.

पारदर्शक रंग - जर तुमच्या लघवीचा रंग पारदर्शक असेल तर याचा अर्थ तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिता. मात्र अति जास्त पाणी पिल्यानेही तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असेल तर सिरोसिर किंवा व्हायरल हेपेटायटीसच्या समस्या देखील उद्भवू शकतात. (Health)

हलका पिवळा किंवा गडद पिवळा रंग - युरोक्रोम पिगमेंटमुळे लघवीचा रंग हलका पिवळा ते गडद पिवळा दिसतो. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा हे रंगद्रव्य पातळ होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे (Hemoglobin) विघटन झाल्यामुळे युरोक्रोम तयार होतो. काहीवेळा रक्तातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त झाल्यास लघवी निऑन रंगातही दिसते.

लाल आणि गुलाबी रंग - हा क्वचित दिसणारा लघवीचा लाल आणि गुलाबी रंग तुम्ही काय खाल्ले यावर अवलंबून असतो. पण लघवीचा हा रंग वाढलेला प्रोस्टेट, किडनी स्टोन, मूत्राशय (prostate, kidney stones)किंवा किडनीमधील गाठ इत्यादी अनेक आजारांमुळे देखील असू शकतो. परंतु अनेकवेळा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाची एखादा पदार्थ खाल्यामुळे ही लघवीही लाल आणि गुलाबी दिसते.

केशरी किंवा ऑरेंज रंग - या रंगाची लघवी येण्याचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता तसेच मिठाची मात्रा अधिक झाल्याचे समजावे. कधी कधी हे काविळचेदेखील लक्षण असू शकतात.

Urine colour Change
Winter Health Tips: हिवाळ्यात ऊन महत्वाचं पण सकाळचं ऊन कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

निळा आणि हिरवा रंग - लघवीचा निळा आणि हिरवा रंग तुम्ही काही खाल्ल्याने होऊ शकतो. मिथिलीन ब्लू नावाचा रंग अनेक कँडीज आणि काही औषधांमध्ये वापरला जातो. ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग निळा दिसू शकतो. परंतु या रंगाचे मूत्र मूत्रपिंड आणि मूत्राशयाशी संबंधित रोग देखील सूचित करते. स्यूडोमोनास एरुगिनोसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, तुमच्या लघवीचा रंगही निळा, हिरवा किंवा जांभळा दिसू शकतो.

गडद तपकिरी रंग - कधीकधी औषधांच्या दुष्परिणामांमुळे लघवीचा रंग गडद तपकिरी दिसू शकतो. गडद तपकिरी रंगाचे मूत्र देखील यकृताशी संबंधित रोगांचा धोका सूचित करतात. लघवीमध्ये पित्ताचा रस मिसळल्यानेही अनेक प्रकरणांमध्ये असे घडते.

लघवीचा वास येणे - लघवीला येणारा वास हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो. हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो, लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते, लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते, बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यांवर परिणाम होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com